Sports Union Budget 2026 News : देशाच्या 2026–27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाची घोषणा करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी क्रीडा क्षेत्रासाठी मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी सांगितले की, भारताकडे उच्च दर्जाचे आणि परवडणारे क्रीडा साहित्य तयार करण्यासाठी जागतिक हब बनण्याची मोठी क्षमता आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हाय-क्वालिटी स्पोर्ट्स सामानाच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि रिसर्चसाठी ‘समर्थ ही विशेष योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. यासोबतच, खेलो इंडिया बाबतही मोठी घोषणा करत त्यांनी पुढील दशकात देशातील क्रीडा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ‘खेलो इंडिया मिशन’ सुरू करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला.
खेलो इंडिया बदलणार क्रीडा क्षेत्राची दिशा
निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, खेलो इंडिया मिशनअंतर्गत एक इंटीग्रेटेड टॅलेंट डेव्हलपमेंट तयार केला जाईल. यामध्ये फाउंडेशनल, इंटरमीडिएट आणि एलिट स्तरावरील ट्रेनिंग सेंटर्सचा समावेश असेल. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफच्या सिस्टिमॅटिक विकासावर भर दिला जाईल. तसेच स्पोर्ट्स सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे इंटीग्रेशन, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी स्पर्धा व लीग्सचे आयोजन, आणि ट्रेनिंग व स्पर्धांसाठी क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
क्रीडा साहित्य स्वस्त होणार...
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी क्रीडा साहित्याच्या निर्मिती व गुणवत्तावाढीसाठी ‘समर्थ’ ही नवी योजना जाहीर केली. या योजनेमुळे उच्च दर्जाचे क्रीडा साहित्य भारतातच तयार करता येईल. या उपक्रमामुळे मेक इन इंडिया मोहिमेला बळ मिळेल, क्रीडा उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि देशांतर्गत कंपन्यांना जागतिक बाजारात स्पर्धा करण्याची संधी मिळेल. यंदा होणाऱ्या एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हे ही वाचा -
