पत्नीपेक्षा वयाने लहान असलेले खेळाडू
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज आणि आयपीएलच्या 9 व्या सीझनमध्ये हैदराबाद संघाला आपल्या धडाकेबाज खेळीने विजय मिळवून देणारा डेविड वॉर्नर हा आपली पत्नीपेक्षा 1.5 वर्ष लहान आहे. काही दिवस लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2015मध्ये लग्न केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली पत्नी अंजलीपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. सचिनचे लग्न 1995 साली झाले. त्याला दोन मुलेही आहेत.
भारतीय संघाचा माजी बॉलिंग कोच व्यंकटेश प्रसादचे पहिले लग्न जयंतीसोबत झाले. ती त्याच्याहून 9 वर्षांनी मोठी होती. या दोघांची ओळख भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळेने करून दिली होती.
सर्वांनाच आपल्या आवडत्या खेळांडूची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ती त्याच्या करिअर संदर्भातील असेल, किंवा त्याच्या वैयक्तिक जीवनातील. आज आम्ही अशाकाही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनासंदर्भात माहिती देणार आहोत. जी वाचून तुम्हीदेखील थक्क व्हाल.
स्पेनचा फुटबॉलपटू गेरार्ड पीकूची पत्नी पॉप स्टार शकीरा त्याच्याहून 10 वर्षांनी मोठी आहे. 2010पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या दोघांनाही दोन मुलं आहेत.
टेनिस स्टार रॉजर फेडररने 2004साली त्याच्याहून चार वर्षांनी मोठी असलेल्या मिरकाशी लग्न केले. त्याच वर्षी मिरकाने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.
भारतीय क्रिकेट संघात 'गब्बर' म्हणून ज्याची ओळख आहे, तो शिखर धवन आपली पत्नी आयशा मुखर्जीहून तब्बल 10 वर्षांनी लहान आहे. 2012 साली धवनचे पहिलं, तर आयशाचं दुसरं लग्न झालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -