News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग, प्रशासकीय समितीची विराटला तंबी

यावर विराटने काय उत्तर दिलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु विराटने हा सल्ला फारच मनावर घेतल्याचं, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटचाहत्याला भारतातून चालता होण्याचा सल्ला दिल्याने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग, अशी तंबी प्रशासकीय समितीने कोहलीला दिल्याचं समजतं. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुक्रवारी रवाना झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून दौऱ्यातील पहिला ट्वेण्टी 20 सामना खेळवण्यात येईल. त्या पार्श्वभूमीवर विराटला ही ताकीद देण्यात आली आहे. परदेशी खेळाडू आवडत असल्यास भारतातून चालता हो, असा सल्ला विराट कोहलीने क्रिकेटचाहत्याला दिला होता. मात्र त्याचा हा सल्ला प्रशासकीय समितीला रुचला नाही. यासंदर्भात समितीने विराट कोहलीशी फोनवरुन बातचीत केली. "मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग. तसंच तुझं वर्तन हे भारतीय कर्णधाराला साजेसं असावं," असं समितीने त्याला सांगितलं. यावर विराटने काय उत्तर दिलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु विराटने हा सल्ला फारच मनावर घेतल्याचं, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं. काय आहे प्रकरण? "भारतीय खेळाडू ओव्हररेटेड आहेत. एक फलंदाज म्हणून सध्या विराट कोहलीचं खूपच स्तोम माजवण्यात येत आहे. त्याच्या फलंदाजीत विशेष असं काही नाही. सध्याच्या भारतीय फलंदाजांपेक्षा मला इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज अधिक भावतात," असं एका चाहत्याने लिहिलं होतं. त्यावर परदेशी खेळाडू आवडत असल्यास भारतातून चालता होण्याचा सल्ला विराट कोहलीने दिला. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका व्हायला लागली. ट्रोल झाल्यानंतर विराट कोहलीने ट्विटरवर उत्तर दिलं. "मला ट्रोलिंगची सवय आहे. कमेंट्समध्ये 'हे भारतीय' ज्या पद्धतीने लिहिलं होतं, त्याबद्दल मी भाष्य केलं, मी कायमच व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करत आलो आहे. फार गांभीर्याने घेऊ नका. सणाचा आनंद घ्या," अशा आशयाचं ट्वीट विराटने केलं होतं.
Published at : 17 Nov 2018 11:11 AM (IST) Tags: COA Virat Kohli

आणखी महत्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?

IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट

IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट

Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?

Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?

11 Bowlers In 1 Innings : क्रिकेटच्या इतिहासात चमत्कार, अख्खी टीमच बॉलिंगला उतरली, वाचा नक्की काय घडलं?

11 Bowlers In 1 Innings : क्रिकेटच्या इतिहासात चमत्कार, अख्खी टीमच बॉलिंगला उतरली, वाचा नक्की काय घडलं?

Ind vs Aus 2nd Test : पहिल्याच सामन्यात ज्यानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं, तोच टार्झन खेळाडू टीम इंडियातून बाहेर, दुसऱ्या सामन्यात कोणाला संधी?

Ind vs Aus 2nd Test : पहिल्याच सामन्यात ज्यानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं, तोच टार्झन खेळाडू टीम इंडियातून बाहेर, दुसऱ्या सामन्यात कोणाला संधी?

टॉप न्यूज़

शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा

शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट

EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन

EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?