टीम इंडियाचा (team india) माजी कर्णधार आणि धुव्वादार फलंदाज रोहित शर्माने (Rohit sharma) काही महिन्यांपूर्वी आपली कार एका तरुणाला गिफ्ट केली होती. रोहित शर्माने आपली कार तरुणाला गिफ्ट केल्यानंतर त्याचं चांगलंच कौतुक झालं, सोशल मीडियातूनही ते व्हायरल झालं होता. आता, रोहितने नवी कोरी टेस्ला कंपनीची कार (car) खेरदी केल्यामुळे पुन्हा रोहित आणि त्याची कार चर्चेत आली आहे. रोहितने खरेदी केलेल्या कारसह त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून या कारचा नंबरही खास असल्याचे दिसून येते. कारण, या कारच्या नंबरसाठी विशेष अंकांना प्राधान्य दिल्याचं दिसून येतं. नंबर प्लेटवरील चार अंक हे रोहितसाठी खास आणि अतिशय प्रिय आहेत. कारण, या दोन्ही अंकातून त्याच्या मुलांची जन्मतारीख दिसून येते.
टीम 20 मधून निवृत्ती घेतल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी रोहित मैदानात उतरणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचं मैदान गाजवणार असून ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळायला छान वाटतं, ऑस्ट्रेलियन टीमसह क्रिकेट खेळणं हे चॅलेंज असतं, असेही रोहितने या दौऱ्यापूर्वी म्हटले आहे. दरम्यान, या दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आपल्या नव्या कारमुळेही चर्चेत आहे. काळी टोपी आणि काळा टी-शर्ट घालून नामवंत टेस्ला कंपनीचा कार चालवताना रोहितचा व्हिडिओ समोर आला आहे. आता, रोहितकडी टेस्ला कारच्या नंबर प्लेटचीही जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कारण, MH01FB3015 असा या गाडीचा नंबर आहे. त्यामध्ये, शेवटचे चार अंक रोहितसाठी खास आणि प्रिय आहेत. त्यामध्ये, दोन-दोन अंकांची फोड करुन जोड द्यावी लागेल. म्हणजेच, 30 आणि 15 हे दोन अंक रोहितसाठी विशेष आहेत.
कारच्या नंबरमागे खास स्टोरी (Rohit sharma tesla car number plate)
रोहित शर्माने डिसेंबर 2015 मध्ये रितिकासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर 30 डिसेंबर 2018 मध्ये रोहितला कन्यारत्न प्राप्त झाले. समायरा असे तिचे नामकरण करण्यात आले असून अनेकदा रोहितचा त्याच्या लेकीसोबतचा फोटो आणि व्हिडिओही पाहायला मिळाला आहे. आता, रोहित शर्माची लेक समायरा लवकरच 6 वर्षांची होणार आहे. तर, 15 नोव्हेंबर 2024 मध्ये रोहित शर्माच्या घरी आणखी एक गुडन्यूज आली होती. रितिकाने 15 नोव्हेंबर 2024 रोजी गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे, रोहितचा हा मुलगा आता लवकरच एक वर्षाचा होणार आहे. रोहितच्या या दोन्ही मुलांची जन्मतारीख पाहिल्यास तुम्हाला टेस्ला कारच्या नंबर प्लेटचं कोडं उलगडेल. कारण, या नंबरप्लेटवरील 30 हा नंबर समायराच्या जन्मतारखेचा असून 15 हा क्रमांक दुसऱ्या मुलाच्या जन्मतारखेचा आहे. म्हणूनच, रोहितने आपल्या नव्या कारचा नंबर खास 3015 असा घेतला आहे.