मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्याआधी भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आपलं नंबर वन स्थान राखलं आहे.


विराट कोहली 922 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विलियमसन 913 अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा चेतेश्वर पुजारा 881 या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.


टीम इंडिया 113 अंकासह कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड 111 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया या यादीत पाचव्या स्थानावर आहे, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या आणि वेस्ट इंडिया आठव्या स्थानावर आहे.


गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसन तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचाच कागिसो रबाडा आहे. भारतीय गोलंदाजांपैकी रविंद्र जाडेजा सहाव्या आणि आर अश्विन दहाव्या स्थानावर आहे.


अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा तिसऱ्या स्थानी आहे. तर बांगलांदेशचा शाकिब अल हसन पहिल्या आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर दुसऱ्या स्थानावर आहे.