Yashasvi Jaiswal And Axar Patel : टीम इंडियाचा उदयोन्मुख ओपनर यशस्वी जैस्वाल आणि अक्सर पटेलने ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत गरुडझेप घेतली आहे. यशस्वी जैस्वालने गरुडझेप घेताना आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप-10 मध्ये आला आहे. अष्टपैलू अक्सर पटेल टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अक्सरने 12 स्थानांनी झेप घेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.






T20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत रवी बिश्नोई हा सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. बिश्नोईच्या मानांकनात 4 स्थानांची घसरण झाली आहे. अक्सर पटेलनं अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. पहिल्या दोन सामन्यात 2-2 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या सामन्यात 23 तर दुसऱ्या सामन्यात केवळ 17 धावा दिल्या. 






यशस्वी जैस्वालची धुवाँधार फलंदाजी 


यशस्वी जैस्वालने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 15 डावात 35.57 च्या सरासरीने आणि 163.82 च्या स्ट्राइक रेटने 498 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. शेवटच्या T20 डावात (अफगाणिस्तानविरुद्ध दुसरा T20) जयस्वालने शानदार फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली होती. याआधी जैस्वालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 60 धावा केल्या होत्या.




फलंदाजीत सूर्यकुमारची जादू अजूनही कायम 


भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सूर्या बर्‍याच काळापासून अव्वल स्थानावर आहे आणि इतर कोणताही फलंदाज त्याच्या जवळही जाऊ शकलेला नाही. सूर्याचे 869 गुणे आहेत. यानंतर इंग्लंडचा फिलिप सॉल्ट 802 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या