Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) टीम इंडियाने (Team India) सेमी फायनलचं तिकीट निश्चित केलंय. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडविरोधात खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा एक महत्त्वाचा सदस्य भारतात परतला आहे. टीम इंडियाच्या या सदस्याच्या आईचे निधन झाले आहे. अशा परिस्थितीत या सदस्याने चॅम्पियन्स ट्रॉफी अर्धवट सोडली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (HCA) एक निवेदन जारी करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
संघ व्यवस्थापक आर देवराज यांच्या आईचे निधन
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान भारतीय संघ व्यवस्थापक आर देवराज यांच्या आईचे निधन झाले आहे. देवराज सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) सचिव आहेत. अशा परिस्थितीत देवराज यांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला आहे. आर देवराज दुबईला परत जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आर देवराज दुबईला परत जाणार की नाही याचा निर्णय मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर होणार आहे.
देवराज गरू आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना - हैदराबाद क्रिकेट असोसिएशन
शोक व्यक्त करताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आमच्या सचिव देवराज यांच्या आई कमलेश्वरी गरू यांचे निधन झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. देवराज गरू आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांच्या वडिलांचेही निधन झाले होते, ज्यामुळे त्यांना दुबईहून दक्षिण आफ्रिकेत मायदेशी परतावे लागले होते. मात्र, स्पर्धेदरम्यान मॉर्ने मॉर्केल दुबईला परतले आणि टीम इंडियात पुन्हा सामील झाले. मात्र संघ व्यवस्थापक आर देवराज परतणार की नाही याबाबत कोणतेही अपडेट नाही. भारतीय संघाच्या प्रत्येक मोठ्या दौऱ्यावर टीम इंडियासाठी नवीन व्यवस्थापक निवडला जातो. खेळाडूंची शिस्त, प्रशिक्षक आणि संघ यांच्यातील समन्वय आणि लॉजिस्टिक्स मॅनेजरची जबाबदारी सहसा व्यवस्थापकाची असते.
इतर महत्त्वाच्या बातम्या