IND Vs AUS 4th T20 Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 174 धावा केल्या. सलामीच्या जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि नंतर पाठोपाठ विकेट पडल्यानंतर रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी डावाची धुरा सांभाळली. फिरकीपटू तनवीर संघा ऑस्ट्रेलियन संघासाठी खूप प्रभावी ठरला, त्याने 30 धावात दोन विकेट घेतल्या. द्वारशियसने 40 धावात तीन विकेट घेतल्या. 






शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी 6 षटकांत 50 धावा जोडल्या. यशस्वी (37) या धावसंख्येवर बाद झाला. 






यानंतर टीम इंडियाने आणखी दोन विकेट्स मागे टाकल्या. अवघ्या 8 धावा करून श्रेयस अय्यर तनवीर संघाच्या फिरकीत अडकला आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने (1) बेन द्वारशियसच्या चेंडूवर त्याची विकेट दिली. अशा प्रकारे, 63 धावांपर्यंत पोहोचेपर्यंत टीम इंडियाचे तीन विकेट गेले होते.






येथून गायकवाडने रिंकूच्या साथीत हळूहळू डाव पुढे नेला. गायकवाड 28 चेंडूत 32 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तन्वीर संघाने त्यालाही बळी बनवले. 111 धावांवर चौथी विकेट गमावल्यानंतर रिंकू आणि जितेश शर्मा यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये 32 चेंडूत 56 धावांची जलद भागीदारी झाली. जितेश 19 चेंडूत 35 धावा करून द्वारशियसच्या चेंडूवर बाद झाला.


इतर महत्वाच्या बातम्या