T20 World Cup 2026 : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. दोन्ही संघ 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये एकमेकांशी भिडणार होते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेत प्रवेश दिला होता. या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारताच्या विरोधात सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. 

भारताचा पाकिस्तानसोबत 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये सामना होणार होता

भारताचा पाकिस्तानसोबत रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये सामना होणार होता. परंतु भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तान भारतासोबत सामना खेळणार नाही. बांगलादेश सरकारने भारतात खेळण्याबाबत सुरक्षेच्या चिंता व्यक्त केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बांगलादेशला स्पर्धेतून काढून टाकल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला.

पाकिस्तानला भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये किती वेळा पराभूत केलं? 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला होणार होता. या सामन्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उत्सुक होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये होणार होती. मात्र आता हा समना होणार नाही, पाकिस्ताने भारताविरुद्धच्या समान्यावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 8 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 6 वेळा भारतानं विजय मिळवला आहे. तर, एका मॅचमध्ये पाकिस्ताननं विजय मिळवला. एक मॅच टाय झाली होती. त्यात देखील भारतानं बॉल ऑऊटमध्ये विजय मिळवला होता. टी 20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमने सामने आले होते. दरबनमध्ये झालेली मॅच टाय झाली होती. बॉल आऊटमध्ये भारतानं त्या सामन्यात विजय मिळवला. याच वर्ल्ड कमपध्ये भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमने सामने आले. भारतानं पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करत  पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला.  2012 मध्ये झालेल्या कोलंबो येथील वर्ल्ड कपमधील सामन्यात भारतानं पाकिस्तानला 8 विकेटनं पराभूत केलं. 2014 मध्ये ढाका आणि 2016 मध्ये कोलकाता येथे भारतानं पाकिस्तानवर सहज विजय मिळवला होता. 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दुबईत पाकिस्ताननं भारताला 10 विकेटनं पराभूत केलं होतं. हा पाकिस्ताननं टी 20 वर्ल्ड कमपध्ये भारतावर मिळवलेला एकमेव विजय आहे. यानंतर पुन्हा पाकिस्तानला विजय मिळाला नाही. भारतानं  2022 मध्ये मेलबर्नमध्ये रोमांचक सामन्यात पाकिस्तानला 4 विकेटनं पराभूत केलं. 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये भारतानं पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला.  

महत्वाच्या बातम्या:

IND vs PAK T20 World Cup:टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला कितीवेळा पराभूत केलं, 2026 मध्ये विजयाची परंपरा सुरु ठेवण्याची संधी,जाणून घ्या रेकॉर्ड