मेलबर्न : श्रीलंकेत दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियासाठी पुढची मालिका अजिबात सोपी नसेल. कारण की, भारत आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. या मालिकेसाठीच ऑस्ट्रेलियानं वनडे आणि टी20 संघची आज (शुक्रवार) घोषणा केली आहे.
17 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबरपर्यंत ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर असणार आहे. ज्यामध्ये वनडे आणि टी20 सामने खेळवण्यात येतील. दरम्यान, या मालिकेसाठी बीसीसीआयनं वेळापत्रक आणि जागेची घोषणा अद्याप केलेली नाही. पण मीडिया वृत्तानुसार 5 वनडे आणि 3 टी20 सामने खेळविण्यात येतील.
या आगामी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं वनडेसाठी 14 जणांचा तर टी20साठी 13 जणांचा संघही निवडला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथकडेच वनडे आणि टी20 संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तर डेव्हिड वॉर्नर हा उपकर्णधार असेल.
ऑस्ट्रेलिया वनडे संघ : स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एशटन आगर, हिल्टन कार्टराइट, नॅथन कुल्टर नाइल, पॅट कमिन्स, जेम्स फॉकनर, अरॉन फिंच, जॉश हेजलवूड, ट्रेविस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), अॅडम झम्पा
ऑस्ट्रेलिया टी20 संघ : स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहर्नडॉर्फ, डेन ख्रिस्टयन, नॅथन कुल्टर नाइल, पॅट कमिन्स, अरॉन फिंच, ट्रेविस हेड, मोएसिज हेन्रीकेज, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन (विकेटकिपर), केन रिचर्डसन, अॅडम झम्पा