एक्स्प्लोर

Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!

Suryakumar Yadav T20 Mumbai: मुंबई टी-20 लीगमध्ये आज ट्रायम्फ नाईट्स एमएनई (Triumph Knights MNE) आणि एमएसई मराठा रॉयल्स (MSE Maratha Royals) यांच्यात सामना रंगला होता.

Suryakumar Yadav T20 Mumbai: खेळाडू कितीही मोठा असो, जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो किंवा त्याला अचानक पदावरून हटवले जाते, तेव्हा तो मैदानाबाहेर काय बोलतो यापेक्षा मैदानावर काय करतो, याला जास्त महत्त्व असते. भारताचा मिस्टर 360 सूर्यकुमार यादवने (SKY) नेमके हेच करून दाखवले. टी-20 वर्ल्ड कप जिंकून अवघे तीन महिने झाले असतानाच, सूर्याला अचानक टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे धुरा सोपवण्यात आली. या निर्णयामुळे सूर्या नाराज असल्याच्या चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, या सर्व वादाला आणि टीकाकारांना सूर्याने आपल्या बॅटने कडक शब्दांत उत्तर दिले आहे.

मुंबई टी-20 लीगमध्ये आज ट्रायम्फ नाईट्स एमएनई (Triumph Knights MNE) आणि एमएसई मराठा रॉयल्स (MSE Maratha Royals) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवने आपल्या संतापाचे रूपांतर एका वादळी खेळीत केले आणि अवघ्या 36 चेंडूंमध्ये नाबाद 72 धावांची खेळी करत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

मराठा रॉयल्सचे आव्हान आणि ट्रायम्फ नाईट्सची खराब सुरुवात

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमएसई मराठा रॉयल्सने 20 ओव्हर्समध्ये 152 धावांचे आव्हान उभे केले होते. मराठा रॉयल्सकडून मॅक्सवेल स्वामीनाथनने 36 तर चिन्मय सुतारने 32 धावांचे योगदान दिले. 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रायम्फ नाईट्सची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर अखिल हेरवाडकर अवघ्या 5 धावांवर तर वेदांत मुरकर 11 धावांवर बाद झाले. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्याने संघ अडचणीत सापडला होता.

सूर्याची 200 च्या स्ट्राईक रेटने धुलाई

दोन गडी लवकर गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. त्याच्या सोबतीला नुतर गोयल होता. गोयलने एका बाजूने 56 धावांची संयमी खेळी खेळली. मात्र, दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने वानखेडेचे मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले. सूर्याने केवळ 36 चेंडूंमध्ये नाबाद 72 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 गगनभेदी षटकार लगावला. तब्बल 200 च्या स्ट्राईक रेटने खेळत सूर्याने मराठा रॉयल्सच्या गोलंदाजांची पार दाणादाण उडवली. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर ट्रायम्फ नाईट्सने हे लक्ष्य अवघ्या 16 ओव्हर्समध्ये पूर्ण करत सामना खिशात घातला.

विशेष म्हणजे, शनिवारीच सूर्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची बातमी आली होती. त्याच दिवशी त्याची आणि नवीन कर्णधार श्रेयस अय्यरची भेट झाली. यावेळी सूर्याने कोणताही आकस न ठेवता श्रेयसची गळाभेट घेतली आणि सामना जिंकल्यानंतर त्याच्या खेळीचे कौतुकही केले. पण आज जेव्हा तो स्वतः मैदानात उतरला, तेव्हा त्याच्या मनातली आग त्याच्या बॅटमधून स्पष्टपणे दिसून आली. सूर्याकुमारने या खेळीतून निवडकर्त्यांना आणि टीकाकारांना स्पष्ट संकेत दिले आहेत. 'मिस्टर 360' पाहायला मिळाला, यात शंका नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Team India : टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TV Actress Struggle Life: वयाच्या 7व्या वर्षी सोडलं घर, फुटपाथवर ब्युटी प्रोडक्ट्स विकून भरलं पोट; पुढे TV ची फेव्हरेट सुनबाई बनली अन् थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी
वयाच्या 7व्या वर्षी सोडलं घर, फुटपाथवर ब्युटी प्रोडक्ट्स विकून भरलं पोट; पुढे TV ची फेव्हरेट सुनबाई बनली अन् थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
Embed widget