एक्स्प्लोर

Ind Vs Pak: अभिषेक शर्माबाबत पाकिस्तानी संघाने 'ती' इच्छा बोलून दाखवली, सूर्यकुमार यादव म्हणाला, 'त्यांची इच्छा असेल तर... '

Suryakumar Yadav PC For IND vs PAK: पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने अभिषेक शर्मानं आजचा सामना खेळावा, अशी इच्छा व्यक्त केली. यावर आता कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी उत्तर देत भाष्य केलं आहे.

Ind Vs Pak Suryakumar Yadav : भारतीयांनाची उत्कंठा लागून राहिलेला टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup 2026)  भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना आज15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशातच पोटाच्या संसर्गामुळे (stomach infection) टीम इंडियाचं ब्रह्मास्त्र म्हणजेच अभिषेक शर्मा (Abhishek Sharma Health Update) नामिबियाविरुद्धचा मागील सामना खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संघात संधी मिळाली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) मैदानात दिसणार का हा प्रश्न साऱ्यांना पडला असता आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा (Salman Ali Agha) याने स्वतः अभिषेक शर्मानं आजचा सामना खेळावा, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी मिश्किलपणे उत्तर देत भाष्य केलं आहे.

Salman Ali Agha : पाकिस्तानच्या कर्णधाराने नेमकं काय म्हटलं?

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी स्वतः अभिषेक शर्माने खेळावे अशी इच्छा व्यक्त केली. आघा म्हणाले, "मला खरोखर आशा आहे की तो (अभिषेक) आज खेळेल, कारण आपल्याला भारताच्या सर्वात मजबूत संघाविरुद्ध खेळायचे आहे. आशा आहे की, तो लवकर बरा होईल." अशा शब्दात सलमान अली आघाने आपली इच्छा व्यक्त केलीय.

Suryakumar Yadav : पाकिस्ताची इच्छा असेल तर तो खेळेल

तर दुसरीकडे जेव्हा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला पाकिस्तानी कर्णधाराच्या विधानाबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो हसला आणि म्हणाला, "जर पाकिस्ताची इच्छा असेल कि अभिषेक शर्मा खेळावा तर तो खेळेल." अशा शब्दात सूर्यकुमार यादवने प्रत्युत्तर दिलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC Hindi (@icchindiofficial)

Suryakumar Yadav : अभ्यासक्रमाबाहेर काहीही नाही, आम्ही तयार अन् उत्सुक आहोत

टी-20 विश्वचषकातील हा सर्वात मोठ्या सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा रहस्यमय फिरकी गोलंदाज उस्मान तारिक सर्वाधिक चर्चेत आला आहे. त्याच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनची सर्वाधिक चर्चा आहे. टीम इंडियाचे फलंदाज पहिल्यांदाच या गोलंदाजाचा सामना करणार आहेत, म्हणून शनिवारी पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला या फिरकी गोलंदाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पत्रकार परिषदेत उस्मान तारिकबद्दल विचारले असता, सूर्यकुमार यादव म्हणाले, "अभ्यासक्रमाबाहेर काहीही नाही. तो एका वेगळ्या प्रकारचा गोलंदाज आहे. म्हणून आम्ही त्याला शरण जाऊ शकत नाही. आम्ही सर्वजण त्याचा सामना करण्यास खूप उत्सुक आहोत. आम्ही तयार आहोत." अशा शब्दात सूर्यकुमार यादवने मिश्किल शब्दात उत्तर दिलंय.

Ind Vs Pak : कधीकधी परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न येतात

पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिकविरुद्धच्या रणनीतीबद्दल भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, "कधीकधी परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न येतात. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. आपल्याला आपला दृष्टिकोन जुळवून घ्यावा लागेल आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करतो. तो वेगळा गोलंदाज आहे, पण आपण हार मानू शकत नाही. म्हणूनच आपण समान गोलंदाजांसह आणि समान कृतींसह सराव करतो आणि आपण निश्चितच त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करू." असेही सूर्यकुमार यादव म्हणाला.

Ind Vs Pak : भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याबाबत सलमान आघा यांचं मोठे विधान

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. हस्तांदोलन करण्याच्या परंपरेबद्दल विचारले असता सलमान आघा म्हणाले, "आम्ही उद्या यावर विचार करू." पाकिस्तानच्या सुरुवातीच्या बहिष्कारानंतर सामन्याभोवती असलेल्या संवेदनशील परिस्थितीत सलमानने कोणताही वाद टाळण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला की सामना क्रिकेटच्या भावनेने खेळला जावा. सलमान आघा पुढे म्हणाले, "मला आशा आहे की हा खेळ सुरुवातीपासून ज्या भावनेने खेळला जात आहे त्याच भावनेने खेळला जाईल."

इतर महत्वाच्या बातम्या

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Chief Selector : बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
IND vs WI 4th T20 : अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
Ind Squad For NZ Test : 8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
IND vs WI 4th T20 : वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget