मुंबई: संजू सॅमसन 61 आणि ऋषभ पंतच्या धडाकेबाज 97 धावांमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने गुजरात लायन्सवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला.


कोटला स्टेडियमवरच्या या सामन्यात गुजरातनं दिल्लीला विजयासाठी 209 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं. पण सॅमसन आणि पंतनं दुसऱ्या विकेटसाठी 63 चेंडूंत केलेल्या 143 धावांच्या भागिदारीनं त्या आव्हानातली हवाच काढून घेतली.

ऋषभ पंतचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्यानं 43 चेंडूंत सहा चौकार आणि नऊ षटकारांसह 97 धावांची खेळी करून दिल्लीला विजयपथावर नेऊन ठेवलं. सलामीच्या संजू सॅमसननं 31 चेंडूंत सात षटकारांसह 61 धावांची खेळी करून दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

रैनाची ऋषभ पंतला शाबासकी

ऋषभ पंत 97 धावांवर आऊट झाला, त्यावेळी 3 धावांनी शतक हुकल्याने तो थोडासा निराश झाला. मात्र त्याचवेळी गुजरातचा कर्णधार सुरेश रैना ऋषभ पंतजवळ येऊन त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

रैनाने ऋषभ पंतचं मनोबल उंचावण्यासाठी मैदानावरच त्याच्या खेळीचं कौतुक केलं.

ऋषभ पंत झेलबाद झाल्यावर, रैना तातडीने त्याच्याकडे आला. रैनाने ऋषभ पंतच्या हेल्मेटवर आपुलकीने थाप मारली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवले.

विरोधी संघाचा कर्णधार असला तरी रैनाने प्रगल्भता दाखवून ऋषभचं केलेलं कौतुक नक्कीच भावणारं आहे.

VIDEO:

https://twitter.com/atulkasbekar/status/860190403445886977