लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला 25 सप्टेंबर रोजी एका युवकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता या मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे स्टोक्सच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 'सन न्यूज'नं एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये स्टोक्स युवकाला मारहाण करताना दिसत आहे.


या व्हिडीओमध्ये स्टोक्ससारखी दिसणारी व्यक्ती एका युवकाला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.

मारहाणीप्रकरणी बेन स्टोक्सला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली होती. त्याला संपूर्ण एक दिवस तुरुंगातही काढावा लागला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी कोणतेही आरोप निश्चित न करता त्याची सुटका करण्यात आली होती. आता हा व्हिडीओ समोर आल्यानं स्टोक्सच्या अडचणी वाढू शकतात.

ज्यावेळी ही मारहाण झाली तेव्हा स्टोक्सचा सहकारी अॅलेक्स हेल्सही त्याच्यासोबत होता. त्यामुळे चौकशीसाठी त्यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या झालेल्या चौथ्या वनडे सामन्याला दोघांनाही मुकावं लागलं होतं. दरम्यान, या मारहाणीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

VIDEO :

 

संबंधित बातम्या :

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला अटक!