बंगळुरु: बंगळुरूत सुरू असलेल्या आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात कोलकात्यानं हैदराबादला सात बाद 128 धावांत रोखून कमाल केली. पण मुसळधार पावसानं या सामन्यात अजूनही खेळाचा खोळंबा करून ठेवला आहे.


पावसाच्या व्यत्ययानं या सामन्यात उत्तरार्धात नेमकं काय होणार याची उत्कंठा ताणून धरली आहे. या सामन्यात जो विजय मिळवेल त्याला फायनलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

पावसानं व्यत्यय आणण्याआधी या सामन्यात कोलकात्याच्या नॅथन कूल्टर नाईलनं तीन आणि उमेश यादवनं दोन फलंदाजांना माघारी धाडून हैदराबादला 128 धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रेण्ट बोल्ट आणि पियुष चावलानंही प्रत्येकी एक विकेट काढली. तर डेव्हिड वॉर्नरनं हैदराबादकडून सर्वाधिक 37 धावांची खेळी केली.