Hyderabad vs Chennai: इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या आज सामन्यात  केन विल्यमसनच्या सनराइजर्स हैदराबादची टक्कर  एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ससोबत होणार आहे. शारजाह येथे सामना खेळवण्यात येणार आहे.


आयपीएलच्या पहिल्या भागात जेव्हा चेन्नई आणि हैदराबाचे संघ जेव्हा समोरासमोर आले आहे. त्यावेळी धोनीच्या संघाने बाजी मारली आहे. या सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा खेळत 20 षटकात 171 धावा बनवल्या. तर हैदराबाद विरुद्ध उतरलेल्या चेन्नईने 18.3 षटकात हे आव्हान संपुष्टात आणले होते. या मॅचमध्ये चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 75 धावा केल्या होत्या. 


SRH vs CSK Head to Head


सनराइजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघात धोनीचा संघाचे पारडे जड आहे. आयपीएलच्या इतिहासात हे दोन संघ आतापर्यंत 15 वेळा समोरासमोर आले आहे. यामध्ये चेन्नई 11 वेळा जिंकली असून हैदराबादला फक्त चार वेळा सामना जिंकता आला आहे.


पॉईंट टेबलमध्ये चेन्नई  पहिल्या स्थानी 


पॉईंट टेबलचा विचार करता चेन्नईचा वर्चस्व कायम आहे. चेन्नईने या हंगामात आतापर्यंत  10 सामने खेळले आहे. या दरम्यान आठ सामन्यात मॅच जिंकता आली आहे. पॉईंट टेबलमध्ये 16 गुणांसह चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादने या हंगामात सीझनमध्ये आतापर्यंत 10 मॅच खेळल्या आहेत. या 10 सामन्यात हैदराबादने दोन सामने जिंकले आहे. पॉईंट टेबलमध्ये हैदराबादचा संघ सर्वात खाली आठव्या स्थानावर आहे.