आयपीएलमध्ये आता प्रेक्षक होणार थर्ड अंपायर
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2016 05:46 PM (IST)
मुंबई : टी20 विश्वचषकाचा फीव्हर संपतो न संपतो, तोच आयपीएलची मेजवानी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. आयपीएलच्या नव्या पर्वात नवनवीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. थर्ड अंपायरकडे कौल मागितलेल्या गेलेल्या चेंडूवर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही आपलं मत नोंदवता येणार आहे. उपस्थित प्रेक्षकांना एक कार्ड देण्यात येईल. त्याच्या एका बाजूला आऊट तर दुसऱ्या बाजूला नॉट आऊट लिहिलं असेल. प्रेक्षकांचं मत टीव्हीवर दाखवण्यात येईल. मात्र थर्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील, प्रेक्षकांच्या निर्णयाचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली आहे. प्रेक्षकांचा सहभाग वाढवण्यासाठी याचा अंतर्भाव करण्यात आल्याचं म्हटलं जातं. आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला बॉलिवूड स्टार रणवीर सिंग, कतरिना कैफ, यो यो हनी सिंग उपस्थित राहणार आहेत.