Palash Muchhal-Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचं लग्न लांबणीवर पडल्याचे जरी सांगितले जात असले तरी स्मृतीने मेहंदीचे फोटो डिलीट केल्यानंतर आता सोशल मीडियावर अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसेच पलाश मुच्छलचे मेंरी डिकॉस्टा नावाच्या मुलीसोबतचे चॅट सोशल माध्यमावर व्हायरल झाली आहे. पलाशने स्मृती मानधनाचा विश्वासघात केल्याचे आणि तो मेरी डिकॉस्टा या एका मुलीसोबत चॅट करत असल्याचे कथीत स्क्रीन शॉट सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत. 

Continues below advertisement

पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टाचे चॅट हे स्मृतीसोबत पलाशचे लग्न ठरल्यानंतरचे (smriti mandhana palash muchhal wedding) असल्याचे देखील त्यात सांगितले जातेय. या चॅटची एबीपी माझा पुष्टी करत नाही.मात्र या व्हायरल होत असलेल्या चॅटबाबत ना पलाशने काही खुलासा केलाय ना स्मृतीने याबाबत काही पोस्ट केलीय. पलाशचे हे चॅट समोर आल्याने  स्मृती आणि पलाशचे या कारणाने तर पुढे ढकलले नाही ना? असा प्रश्न सोशल माध्यमावर विचारला जात आहे. दरम्यान स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच श्रीनिवास मानधनाच्या (Shrinivas Mandhana) करण्यात आलेल्या एन्जोग्राफीत ब्लॉकेज नसल्याचे रिपोर्ट आलेत. 

स्मृती मानधना कौन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमात काय म्हणाली होती? (Smriti Mandhana KBC)

स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाचा एक कौन बनेगा करोडपतीमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृतीने क्रिकेटमधील प्रवाशाबाबत खुलासा केला होता. स्मृती मानधना आणि इशान किशन कौन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सुरुवातीच्या काळात तिला मुलांसोबत खेळावे लागत असे, कारण त्यावेळी फार कमी मुली क्रिकेट खेळत होत्या, असं स्मृती म्हणाली. तसेच जर स्मृती अशीच राहिली तर तिचे लग्न होणार नाही, असंही लोक माझ्या पालकांना टोचून बोलायचे, असा खुलासा स्मृतीने कौन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमात केला होता. 

Continues below advertisement

मेरी डिकॉस्टा कोण? (Who Is Mary Dcosata News)

मेरी डिकॉस्टा ही नृत्यदिग्दर्शक आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नसोहळ्यात दोघांच्या डान्सची कोरिओग्राफी मेरी डिकॉस्टा करणार होती. गेल्या काही महिन्यांपासून पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टा यांचे अफेअर सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या चॅटिंगवरुन दोघांमध्ये बरीच जवळीक असल्याचे दिसत आहे.

संबंधित बातमी:

Who Is Mary D'Costa?: स्मृती-पलाशच्या नात्यात विष कालवणारी Mary D'Costa कोण? लग्नाच्या आदल्या रात्री पलाशसोबत रंगेहाथ सापडली?