उपचारानंतर आठवडाभराने श्रेयस पुन्हा सराव सुरु करू शकेल. 2015 साली श्रेयसने दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी भरीव कामगिरी बजावली होती. गेल्या मोसमात त्याला आपला ठसा उमटवता आला नाही. यंदा मात्र श्रेयस दमदार फॉर्ममध्ये आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात श्रेयसने द्विशतकही ठोकलं होतं. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविडलाही श्रेयसकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. श्रेयसचं आजारपण हा दिल्लीच्या टीमसाटी चौथा मोठा धक्का ठरला आहे.
याआधी जेपी ड्युमिनी आणि क्विन्टॉन डी'कॉक या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातल्या दक्षिण आफ्रिकी शिलेदारांनी दुखापतींच्या कारणास्तव आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घेतली आहे. तर दिल्लीचा श्रीलंकन शिलेदार अँजलो मॅथ्यूजच्या आयपीएलमधील सहभागावरही प्रश्नचिन्ह कायम आहे.