शिखर धवनने भर मैदानात भांगडा करुन प्रेक्षकांसोबत मजा-मस्ती केली. सामना सुरु असताना सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या धवनने डान्स केला. चाहतेही धवन धवन असे ओरडत होते, तसा धवनही फुलत होता.
धवनच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.
धवन सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता, त्यावेळी तिथे ढोल वाजत होते. ढोलच्या आवाजाने शिखरने भांगडा केला. मग प्रेक्षकांनाही हुरुप आला. प्रेक्षकांनी धवनच्या नावाने जल्लोष केला तसा धवननेही आपल्या अदा सादर केल्या.
या कसोटी सामन्यात इंग्लंड टीम एकवेळ 1 बाद 133 अशा भक्कम स्थिती होती. मात्र ईशांत, बुमरा आणि जाडेजाने चहापानानंतर भेदक मारा करत, दिवसअखेर 7 बाद 198 अशी अवस्था केली. इंग्लंडची ही अवस्था, प्रेक्षकांचं प्रोत्साहन आणि सोबतच्या ढोलताशांमुळे धवनच्या उत्साहाला उधाण आलं.
संबंधित बातम्या
ईशांत, बुमरा, जाडेजाची वेसण, दिवसअखेर इंग्लंडच्या 7 बाद 198 धावा
'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न
पृथ्वी शॉला संधी नाहीच, हनुमा विहारीचं कसोटी पदार्पण
अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च!