नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून निवड झाली आहे. आयसीसीने अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान केलं होतं. यानंतर शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड झाली. शशांक मनोहर दोन वर्षांसाठी आयसीसीचे चेअरमन असतील.


 

"क्रिकेट अधिक संपन्न करण्यासाठी मी सर्व देशांच्या बोर्डांसह मिळून काम करण्याचा प्रयत्न करेन," अशी प्रतिक्रिया शशांक मनोहर यांनी आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर दिली.

https://twitter.com/ICC/status/730635262204760064

आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मनोहर यांच्या राजीनाम्यानंतर आता बीसीसीआयमध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांचं नाव सध्या चर्चेत आहे.

 

याशिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांचं नावही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. शिर्केंना शरद पवारांचा पाठींबा असल्याचही बोललं जात आहे. पण अनुराग ठाकूर यांच्यापाठीमागे असलेली भाजपची ताकद पाहता, सध्यातरी ठाकूर यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे.

 

संबंधित बातम्या

BCCI अध्यक्षपदाच्या राजीनाम्यास भाग पाडलं : शशांक मनोहर


शशांक मनोहर यांचा राजीनामा, शरद पवार BCCI चे नवे अध्यक्ष?