रांची : ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या चिवट खेळीमुळे रांचीमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मोठे संकेत दिले आहेत.
विराट कोहलीने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत संकेत दिले की, फिट मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात समावेश होऊ शकतो.
मोहम्मद शमीने विजय हजारे करंडकाच्या अंतिम सामन्यात बंगाल संघाकडून खेळताना तामिळनाडूविरुद्ध चार विकेट घेतल्या.
कोहली म्हणाला की, "आम्ही त्याला तिथे खेळण्यासाठी पाठवलं आहे. आम्हाला त्याला प्रॅक्टिस द्यायची होती. मी निवड समितीशी चर्चा केलेली नाही. पण पुढच्या सामन्यासाठी ह्या सगळ्या शक्यता आहेत.
जर मोहम्मद शमीचा संघात समावेश झाला तर तीन महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक करेल आणि भारतीय गोलंदाजी मजबूत होईल.
मोहम्मद शमी 2015 विश्वचषकपासूनच दुखापतग्रस्त आहे. यामुळे टीम इंडियाचं मोठं नुकसानही झालं आहे.