✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पहिल्या कसोटीपूर्वी विराट कोहलीसमोर या अडचणी?

एबीपी माझा वेब टीम   |  20 Jul 2016 01:09 PM (IST)
1

टीम कॉम्बिनेशन: विराट कोहली कसोटी कर्णधार झाल्यापासून प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळाला आहे. कोहली 7-4 पेक्षा 6-5 या फॉर्म्युलावर भर देतो. पण मागील मालिकेत भारतानं 4 गोलंदाज खेळवले होते. त्यामुळे आता कोहली कोणत्या कॉम्बिनेशनला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

2

गोलंदाज कोण कोण?: कोहलीच्या संघात अमित मिश्रा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि मोहम्मद शमी हे गोलंदाज आङे. पण वेस्टइंडिजच्या खेळपट्ट्यांचा विचार केला तर ईशांत आणि शमीला संधी मिळू शकते. तर फिरकी गोलंदाज म्हणून अश्विन आणि मिश्रा खेळू शकतात. पण संघामध्ये जडेजा कि बिन्नी यापैकी कोणाला जागा द्यायची हा मोठा प्रश्न असणार आहे.

3

क्रमांक ३ वर कोण?: सलमीवीर फलंदाजानंतर क्रमांक ३ वर कोण खेळणार ही कोहलीची समस्या आहे. कोहलीला या क्रमांकासाठी रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. द्रविडनं कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर पुजारा या क्रमांकावर खेळत आला आहे. पण मागील काही सामन्यांमध्ये पुजाराला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात येत आहे तर रहाणे क्रमांक ३वर फलंदाजी करतो आहे.

4

सलामीवीर: कोहलीला सलामीवीर म्हणून शिखर धवन किंवा केएल राहुल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. मुरली विजय दुसरा सलामीवीर म्हणून टीम इंडियाची पहिली पसंत आहे.

5

दोन सराव सामन्यानंतरही टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन ठरवू शकत नाही. कर्णधार कोहलीनं 13 खेळाडूंची निवड केली आहे. ज्यामध्ये मुरली विजय, केएल राहुल, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, अमित मिश्रा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, ईशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि मोहम्मद शामी आहे.

6

टीम इंडिया वेस्टइंडिजविरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहे. दोन सराव सामन्यानंतर आता 21 जुलैला पहिली कसोटी खेळण्यासाठी टीम इंडिया उतरणार आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्यानं वेस्टइंडिजला नक्कीच फायदा मिळेल. त्यामुळे कसोटी मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला पहिली कसोटी जिंकावी लागणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • क्रीडा
  • पहिल्या कसोटीपूर्वी विराट कोहलीसमोर या अडचणी?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.