मुंबई : कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मतभेद असल्याच्या बातम्या येत असतानाच, टीम इंडियाच्या इंग्लंडमधल्या मुक्कामात एक सुखद चित्र दिसत आहे. कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ही जोडगोळी कुठं पाहावं तिथं एकत्र दिसत आहे.


एक से भले दो आणि एक और एक ग्यारह अशी हिंदीत वचनं आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्धचा सामना तोंडावर आलेला असताना विराट आणि धोनी यांनी त्या वचनांची ताकद ओळखलेली दिसते.

बर्मिंगहॅममध्येही ते दोघं टीम इंडियाच्या मोजक्या शिलेदारांना घेऊन डिनर गेल्याची दृश्यं एबीपी माझानं टिपली आहे.

विराट आणि धोनीच्या साथीनं भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि केदार जाधव या डिनर प्लॅनमध्ये सहभागी झाले होते. बुल रिंग परिसरातल्या रेड हॉट या चायनीज रेस्टॉरंटमध्ये ही मंडळी गेली होती. तिथल्या डिनर टेबलवर विराट, धोनी आणि त्यांच्या विश्वासू शिलेदारांनी खाण्याच्या गप्पांपेक्षा सिक्रेट रणनीतीची आखणीच केल्याचं समजतं.