मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा ( Sania Mirza) आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु, या सर्व बातम्या सुरू असतानाच आता सानिया आणि शोएब त्यांच्या नवीन टॉक शोमध्ये एकत्र आले आहेत. शोएब मलिकच्या इंस्टाग्राम बायोने दोघांच्याही चाहत्यांना धक्का दिला आहे.
शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम बायोद्वारे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये सानियासाठी जे काही लिहिले आहे ते पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्काच बसलाय. लवकरच येत आहे "द मिर्झा मलिक शो" असे सांगत त्याने सानियाला 'सुपरवुमन' म्हटले आहे. यासोबतच शोएब मलिकने त्याचा आणि सानिया मिर्झाचा नवीन टॉक शो 'द मिर्झा मलिक शो'चा टीझरही शेअर केला आहे.
शोएब मलिकने नुकतेच एक्सप्रेस ट्रिब्यूनसोबत संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, 'ही माझी आणि सानियाची वैयक्तिक बाब आहे. मी किंवा माझी पत्नी सानिया मिर्झा या प्रकरणावर कोणतेही उत्तर देत नाही'.
सानिया मिर्झाने 2010 मध्ये शोएब मलिकशी लग्न केले आहे. तेव्हापासून दोघेही आपले वैवाहिक जीवन आनंदाने एकत्र जगत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी शोएब मलिकच्या एका मित्राने हे दोघे अधिकृतपणे वेगळे झाल्याचे सांगितले होते. शोएब सानियाच्या घटस्फोटांच्या बातम्यांमुळे एकच खळबळ उडाली होती. दोघांच्या वेगळं होण्याच्या निर्णयामुळे सोशल मीडियावरून दोघांवर जोरदार टीका देखील झाली होती. परंतु, प्रत्यक्षात दोघांमध्ये असं वेगळं काही देखील झालं नसल्याचं समोर आलं. परंतु, आता शोएबच्या इन्स्टाग्राम बायोने चाहत्यांच्या मनात हे दोघे वेगळे झाले आहेत की नाही, असे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.