मुंबई : सोशल मीडियावर दरदिवशी कोणी ना कोणी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतं. यावेळी खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच एका ट्वीटमुळे ट्र्रोलर्सच्या जाळ्यात अडकला.


विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ठोकलेलं धडाकेबाज शतक आणि आव्हानाबद्दलचं ट्वीट सचिनने केलं होतं. हे ट्वीट चुकीचं नव्हतं पण त्याची वेळ चुकीची होतं. खरंतर हे ट्वीट भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्याच्या पहिल्या इनिंगनंतर करायला हवं होतं, पण ट्वीट केलं आज सकाळी. मग काय सचिनची फिरकी घेण्याची आयती संधीच ट्रोलर्सना मिळाली.

काय लिहिलंय ट्वीटमध्ये?
ट्वीटमध्ये मास्टरब्लास्टरने लिहिलं आहे की, "रोहित आणि विराटची शानदार बॅटिंग. हा सामना अटीतटीचा होणार हे नक्की. आपण हा सामना जिंकू अशी अपेक्षा आहे."

https://twitter.com/sachin_rt/status/924807748973244422

सचिनने हे ट्वीट सोमवारी सकाळी 6:48 वाजता केलं, पण भारताने रविवारी रात्रीच हा सामना 6 धावांनी जिंकला होता. याच कारणामुळे सचिन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला.





दरम्यान या सामन्यात रोहित शर्माने 147 धावा आणि विराट कोहलीने 113 धावांची शतकी खेळी केली. भारताच्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने 331 धावा केल्या. परिणामी भारताने या सामन्यात सहा धावांनी विजय मिळवला.