सचिनची हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत क्रिकेट खेळतानाची ही दृश्यं रात्री उशिराची आहेत. तसंच मेट्रोच्या खोदकामासाठी व्यापलेला रस्ताही या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
खुद्द सचिन तेंडुलकर रस्त्यावर फलंदाजी करत असल्याचं अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. रात्री रस्त्यावर खेळणारी मुलं पाहून खुद्द सचिनंही स्वत:ला यावेळी रोखू शकला नाही.
...म्हणून मी सचिनचा हा व्हिडीओ पोस्ट केला : विनोद कांबळी
सचिन तेंडुलकरचा हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या विनोद कांबळीशी जेव्हा एबीपी माझाने संपर्क साधला त्यावेळी तो म्हणाला की, ‘हा व्हिडीओ आपल्याला एका मित्राने पाठवला. त्यानंतर तो मी सोशल मीडियावर पोस्ट केला. सचिन हा क्रिकेटचा देव आहे. अनेकांना सचिनला पाहण्याची उत्सुकता असते. अशावेळी खुद्द सचिन रस्त्यावर रात्रीच्या वेळी क्रिकेट खेळताना पाहून मलाही आश्चर्य वाटलं. म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट केला.’ असं विनोद म्हणाला.