Mumbai Indians : हार्दिक पांड्याचे मुंबई फ्रँचायझीमध्ये पुनरागमन झाल्यानंतर नेतृत्व बदल करत रोहित शर्माला बदलण्याचा निर्णय घेतला. मेगा घोषणा केल्यापासून मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. दरम्यान, कर्णधार बदलण्याच्या फ्रेंचायझीच्या निर्णयानंतर सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स सोडल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. सचिन तेंडुलकर मुंबईचा मेन्टाॅर आहे. 


दरम्यान, सोशल मीडियात केले जाणारे दावे खोटे आहेत. सचिन तेंडुलकर अजूनही मुंबई इंडियन्सशी आयकॉन म्हणून जोडलेला आहे. सोशल मीडियातून उठवण्यात आलेली अफवा खोटी आहे. सचिन आयपीएलच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे आणि त्यांच्यासोबतच राहिला आहे. त्याने आयपीएल 2011 ते 2012 पर्यंत एमआयचे नेतृत्व केले. सचिनने 2012 मध्ये कर्णधारपद सोडले आणि पुढील दोन हंगामात तो एक स्पेशल फलंदाज म्हणून खेळला.


2013 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकल्यानंतर मास्टर ब्लास्टरने IPL मधून निवृत्ती घेतली. चॅम्पियन्स लीग फायनल खेळल्यानंतर त्याने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, जी MI ने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून जिंकली. काही दिवसांनंतर, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि वानखेडे स्टेडियमवर भारतासाठी शेवटचा सामना खेळला. सचिनने आयपीएल 2014 पासून एमआयचा आयकॉन म्हणून कार्यभार स्वीकारला.


संघाचा आयकॉन म्हणून सचिनची भूमिका ही अर्धवेळ आहे आणि तो प्रत्येक खेळासाठी प्रवास करत नाही. तो IPL 2020 साठी UAE ला गेला नव्हता. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला MI ने IPL 2024 साठी कायम ठेवले होते.


हार्दिक पांड्याची कारकीर्द अशी आहे


जर आपण हार्दिक पांड्याबद्दल बोललो तर, तो प्रथमच आयपीएल 2015 मध्ये खेळला होता, तो मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. यानंतर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून 6 हंगाम खेळत राहिला. परंतु आयपीएल लिलाव 2022 पूर्वी, हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले नाही, त्यानंतर हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा भाग बनला. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 जिंकली. त्यानंतर आयपीएल 2023 ची अंतिम फेरी गाठली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे गुजरात टायटन्स उपविजेतेपदावर राहिला. मात्र, आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्या आपल्या जुन्या टीम मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.


...म्हणून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?


दुसरीकडे, रोहित शर्मा आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळणार की दुसरा काही मार्ग स्वीकारणार? रोहित शर्मा आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो, असेही सोशल मीडियावरील अनेक यूझर्सना वाटते. म्हणजेच तो मुंबई इंडियन्स सोडणार आहे. मात्र, या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे सध्या अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. पण सोशल मीडियावर अटकळ सुरूच आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या