लंडन: इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कूकनं कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला ओलांडणारा सर्वात युवा फलंदाज हा सचिन तेंडुलकरचा विक्रम नुकताच स्वत:च्या नावावर जमा केला. विशेष म्हणजे त्या पराक्रमानंतरही कूकचे पाय अजूनही जमिनीवर आहेत.


 

सचिन तेंडुलकरचा 200 कसोटी सामन्यांमधला सर्वाधिक 15921 धावांचा विक्रम मोडण्यासाठी कूकला मोठी पसंती देण्यात येत आहे. पण सचिनच्या त्या विक्रमापासून आपण अजून खूप दूर असल्याचं इंग्लंडच्या कर्णधारानं विनयानं सांगितलं. तो म्हणाला की, सचिन हा एक जिनीयस फलंदाज होता. माझी त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही.

 

कूकनं आजवरच्या कारकीर्दीत 128 कसोटी सामन्यांमध्ये 10042 धावा केल्या आहेत. सचिनच्या सर्वाधिक धावांच्या विक्रमापासून कूक 5879 धावांनी दूर आहे.