आदित्यच्या उपचारांसाठी त्याच्या कुटुंबानं आपलं राहतं घरही गहाण टाकलं आहे. अशावेळी क्रिकेटर आरपी सिंहनं आदित्यला मदत करावी यासाठी ट्वीटरवरुन आवाहन केलं आहे.
या ट्वीट सोबत आरपी सिंहनं एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीचं कात्रणही शेअर केलं आहे. यामध्ये सर्व बँक डिटेलही देण्यात आले आहेत. तसेच आदित्यला जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहनही त्यानं केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली आदित्यची एक किडनी निकामी झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर आजपर्यंत उपाय सुरु आहेत.
दरम्यान, आदित्य पाठकनं उत्तर प्रदेशच्या कानपूर क्रिकेट असोसिएशनसाठी अंपायरिंगही केलं आहे.