मुंबई : भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं, यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळवला. या अंतिम सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. रोहित शर्माच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक धावा करणाच्या विक्रम आहे, तर विराट कोहलीच्या नावावर विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. 


विराट कोहली, रोहित शर्माची जागा कोण घेणार?


आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी20 मधील निवृत्तीनंतर त्यांच्या जागी कोण भारतीय संघाची जबाबदारी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहित आण विराटच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाने दोन वर्षांनंतर होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात केली आहे. टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. वर्ल्ड कप सुरु होण्याला अजून बराच वेळ असला तरी तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. मात्र, कोहली आणि रोहितच्या निवृत्तीनंतर आता त्या दोघांच्या जागी 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये कोण खेळणार असा सवाल उपस्थित होत आहे.


कोहली आणि रोहितला पर्याय कोण?


तज्ज्ञांच्या मते, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल ही जोडी विराट आणि रोहितची जागा घेऊ शकते, असं सांगितलं जात आहे. गिल आणि जैस्वाल यांनी झिम्बाब्वे विरुद्धच्या शेवटच्या तीन T20I मध्ये भारतीय संघासाठी सलामीला उतरली आणि त्यांची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. दरम्यान, काहींच्या मते, अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड देखील चांगला पर्याय असून त्यांच्यासारख्या खेळाडूंना देखील दुर्लक्षित करता येणार नाही. 


T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराटला पर्याय कोण?


टीम इंडियाचा माजी यष्टिरक्षक क्रिकेटर दिनेश कार्तिकने कोहली आणि रोहितच्या जागी चार नवे सुचवली आहेत. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीतल दिनेश कार्तिकला विचारण्यात आलं की पुढील टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराटचा पर्याय कोण असेल? यावर तो म्हणाला की, "सर्वप्रथम, रोहित आणि कोहली यांची जागा घेणं खूप कठीण आहे, पण मला वाटतं की सध्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार पर्याय आहेत. ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा आणि शुभमन गिल. मला वाटते यशस्वी जैस्वाल टी20 मध्ये सलामीला उतरेल."