नवी दिल्ली : भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये किती सामने खेळायचे हा निर्णय सर्वस्वी खेळाडूंचा असल्याचं वक्तव्य टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं केलं आहे.  भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलच्या काळात आपल्यावर येणारा ताण हुशारीनं हाताळावा लागेल. आगामी विश्वचषकासाठी ताजंतवानं आणि तंदुरुस्त राहण्याची त्यांची वैयक्तिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं केलं आहे.


आम्हाला असा वेळ सांगावा ज्या वेळी खेळाडू आराम करु शकतो, आम्हाला मिळालेल्या संधीचा आम्ही नक्कीच उपयोग करु. विश्वचषक हा दर चार वर्षांनी एकदा येतो आणि आयपीएल चे दरवर्षी होतं पण याचा अर्थ आम्ही विश्वचषकासाठी उत्साही नाही असं नाही असं वक्तव्य कोहलीने पत्रकारांशी बोलताना केलं. तसेच प्रत्येक खेळाडूला आरामाची गरज असल्यास त्यांनी आपापल्या संघमालकांशी चर्चा करावी अशा सुचना खेळाडुंना देण्यात आल्या आहेत.

यंदा आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात होत असून, या लीगचा अंतिम सामना मे महिन्यात खेळवण्यात येणार आहे. तर इंग्लंडमधल्या विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळेच भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलच्या काळात येणारा ताण कौशल्यानं हाताळण्याच कस लागणार आहे.

आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.

संबंधित बातम्या

यावर्षीच्या आयपीएल स्पर्धा भारतातच, तारीखही ठरली

यंदा आयपीएल उद्धाटन सोहळ्याच्या झगमगाटाला काट, बीसीसीआयचा निर्णय

'हा' संघ यंदाचं आयपीएल जिंकणार, शेन वॉर्नची भविष्यवाणी