... म्हणून इंग्लंडला आर. अश्विनची धडकी
अलीकडेच न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे इंग्लड आणि बांग्लादेश यांच्यातील मालिका अनिर्णीत राहिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील इंग्लंडसोबतच्या मालिकेपासून सुरु झालेला त्याचा चांगल्या कामगिरीचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे.
भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट मैदानात होत आहे.
अश्विनने 2012-13 मध्ये सर्वाधिक विकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत घेतल्या. त्याने या मालिकेत एकूण 29 बळी घेतले.
पण 9 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींची नजर टीम इंडियाचा सर्वात यशस्वी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या कामगिरीवर असेल.
गेल्या चार वर्षात अश्विनने चांगली कामगिरी करत, प्रत्येक मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याची कामगिरी चांगली होती. 2013-14 मध्ये अश्विनने सर्वोत्तम कामगिरी करत 12 विकेटस घेतल्या.
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या संघालाही अश्विननेच्या प्रभावी माऱ्याचा सामना करावा लागला. या मालिकेत अश्विनने दक्षिण अफ्रिकेचे 31 बळी घेतले.
दक्षिण अफ्रिकेनंतर न्यूझीलंड संघालाही अश्विनने आपल्या तालावर नाचवलं. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनने 27 गडी बाद केले.
अश्विनच्या या धमाकेदार कामगिरीमुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्या फिरकीमुळे इंग्लंड संघ गारद होईल अशी अपेक्षा सर्वांना आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -