मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला उद्या 30 ऑगस्टपासून साउदम्प्टनमध्ये सुरुवात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1ने पिछाडीवर आहे. भारताने तिसऱ्या नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि 203 धावांनी दणदणीत पराभव करुन, कसोटी मालिकेत पुनरागमन केलं. भारताच्या तिसऱ्या कसोटीतील कामगिरीवर प्रशिक्षक रवी शास्त्री चांगेलच खूश आहेत. भारताची हीच विजयी लय चौथ्या कसोटीतही कायम राहिल अशी आशा त्यांना आहे.

भारताच्या तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, रवी शास्त्री यांनी इंग्लंडमध्ये मराठीत उत्तर दिलं.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी इंग्लंडमधील पत्रकार परिषदेत रवी शास्त्री यांना मराठीत प्रश्न विचारला.

जेव्हा कसोटी सामना जिंकता तेव्हा असं वाटतं की एक-दोन फलंदाज, एक-दोन गोलंदाज चांगली कामगिरी करतात. पण जेव्हा संपूर्ण टीम, 11 खेळाडू सर्वोत्तम देतात, तेव्हा जास्त समाधान मिळतं?

त्यावर रवी शास्त्रींनी अन्सर इन इंग्लिश, हिंदी, मराठी? असं विचारत, मराठीत उत्तर द्यायला सुरुवात केली.

रवी शास्त्री म्हणाले, “चांगलं वाटतं, फार चांगलं वाटतं. जेव्हा सगळे चांगले परफॉर्म करतात, तेव्हा मजा येते. बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग”

मग सुनंदन लेले यांनी कॅप्टनचा परफॉर्मन्स कसा वाटला? असं विचारलं

त्यावर रवी शास्त्री म्हणाले, “काय सांगायचं? असं खेळणार तर काय सांगायचं? वेल प्लेडच म्हणेन. चॅम्पियन्स प्लेयर आहेत”


संबंधित बातम्या 

नवख्या पंतला डिवचणाऱ्या ब्रॉडला कोहलीने धडा शिकवला!  

दहा मिनिटांत खेळ खल्लास, भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय