बंगळुरु : बंगळुरुतल्या सराव शिबिराच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनला सरावादरम्यान दुखापत झालीय.


 
अश्विन नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना, मोहम्मद शमीचा चेंडू त्याच्या डाव्या हातावर आदळला. त्यामुळे अश्विननं तातडीनं फलंदाजी सोडून ड्रेसिंग रुममध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

 

अश्विननं ड्रेसिंग रुममध्ये टीम फिजियोकडून उपचार करुन घेतले आणि त्यानंतरच तो मैदानात परतला. मात्र मैदानात परतल्यावर अश्विनला गोलंदाजी करताना त्रास होताना दिसला.  दरम्यान अश्विनची ही दुखापत किती गंभीर आहे हे अद्यापही समजू शकलेलं नाही.