Pro Kabaddi League: प्रो कबड्डीच्या हंगामातील 28 व्या सामन्यात गुजरातला पराभूत करून हरिणाच्या संघानं दुसऱ्या विजय नोंदवलाय. या सामन्यात हरियाणानं गुजरातचा 38- 36 फरकानं पराभव केलाय.  एका टप्प्यावर 14 गुणांनी पिछाडीवर पडल्यानंतर गुजरातनं आघाडी घेत गुणांमधील फरक कमी केला. अखेर हरियाणानं दोन गुणांनी ही लढत जिंकली. या सामन्यात हरियाणाची अष्टपैलू खेळाडू मीतूनंही सुपर 10 पूर्ण केला.


सामन्याच्या सुरुवातीपासूनच हरियाणानं दबाव कायम ठेवून गुजरातला पूर्वार्धात दोनदा ऑलआऊट केलं. पहिल्या हाफमध्ये हरियाणानं 22-10 अशी आघाडी घेतलीय. दुसऱ्या हाफमध्ये गुजरातच्या संघानं कमबॅक केलं. रेडर राकेशच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर गुजरातनं पुनारागमन केलं. अखेर विकास कंडोल आणि मीतू महेंद्रनं चांगली खेळी करत हरियाणा विजय मिळवलाय.  


बंगळरुचा पुण्यावर विजय
आजच्या दुसऱ्या सामन्यात बेंगळुरू बुल्सने पुणेरी पलटणचा पराभव केला. पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली बंगळुरूचा हा चौथा विजय आहे. दुसरीकडे, पुणेरीचा हा मोसमातील चौथा पराभव आहे.


सुरुवातीला पुणेरी पलटणनं चांगला खेळ केला. राहुल चौधरीच्या अनुपस्थितीत अस्लम इनामदारनं पहिल्या हाफनंतर आघाडी घेत 18-12 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये बंगळुरूनं आक्रमक खेळ दाखवला. कर्णधार पवननं सुपर 10 पूर्ण केला. चंद्रन रंजीत आणि भरतकडून त्याला चांगली साथ मिळाली. अखेर बेंगळुरूच्या संघानं हा सामना 40-29 अशा फरकानं विजय मिळवलाय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha