या सामन्यात गुजरात फॉर्च्यूनजायंट्स संघाने पुणेरी पलटणचा 35-20 ने पराभव करत गुजरातच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या विजयासह गुजरातने अ गटात यू मुम्बाला मागे टाकत पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे. अ गटात खेळल्या गेलेल्या 15 सामन्यांपैकी 11 सामन्यांमध्ये गुजरातने बाजी मारली आहे. याचबरोबर 63 गुणांसह अंकतालीकेत पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान पुणेरी पलटनला अ गटात खेळल्या गेलेल्या 18 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये पुणेरी पलटनला पराभव पत्कारावा लागला आहे.
या सामन्यात गुजराततर्फे रेडींगमध्ये सचिन 7, प्रापरंजन 5 , सुनील कुमार, रोहित गुलिया आणि ऋुतूराज कोरावी यांनी प्रत्येकी चार चार गुणांची कमाई केली.