PBKS vs SRH, IPL 2021 1st Innings Highlights: चेन्नईमध्ये सुरु असलेल्या पंजाब आणि हैदराबादमधील सामन्यात हैदराबादनं पंजाबला 120 धावांमध्ये रोखलं आहे. पंजाबचा संघ 120 धावांवर ऑलआऊट झाला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही.  केएल राहुल केवळ चार धावांवर बाद झाला. तर मयंक अग्रवाल 22 धावांवर बाद झाला.  6 षटकात पंजाबने 32 धावा फलकावर लावल्या. 


पॉवरप्लेनंतर मयंक बाद झाला. खलील अहमदने त्याला (22) झेलबाद केले. अग्रवालनंतर आलेला निकोलस पूरनही शून्यावर धावबाद झाला. राशिद खानने ख्रिस गेलला पायचित करत पंजाबला मोठा धक्का दिला. गेलला केवळ 15 धावा करता आल्या. गेल बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव सावरलाच नाही.  दीपक हुडा 13 धावांवर तर मोझेस हेन्रिक्स 14 धावांवर बाद झाले. 


त्यानंतर आलेल्या शाहरुख खानने 2 षटकारांसह 22 धावा करत संघाला 100 पार पोहोचवले. मात्र तो 22 धावांवर बाद झाला. शाहरुख बाद झाल्यानंतर पंजाबच्या तळाच्या फलंदाजांनीही नांग्या टाकल्या. शेवटच्या षटकात मोहम्मद शमी धावबाद होताच पंजाबचा डाव 120 धावांवर संपुष्टात आला.  हैदराबादकडून खलील अहमदने 21 धावांत 3, अभिषेक शर्माने 2 तर भुवनेश्वर कुमार, राशिद खान, सिद्धार्थ कौलनं एक एक विकेट घेतली.