लंडन : फ्रान्सचा पॉल पोग्बा जगातला सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे. पॉल पोग्बानं इंग्लंडच्या मॅन्चेस्टर युनायटेडशी 5 वर्षांसाठी जवळपास 815 कोटी रुपयांचा करार केला आहे.

 

पोग्बानं कमाईच्या बाबतीत आता गॅरेथ बेल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना मागे टाकलं आहे. गॅरेथ बेलनं 2013 साली रिआल माद्रिदशी 740 कोटी रुपयांचा करार केला होता.

 

दरम्यान पॉल पोग्बानं आपल्या कारकीर्दीची सुरुवात ही मॅन्चेस्टर युनायटेडकडूनच केली होती. पण 2012 साली मॅन यूला रामराम ठोकून पोग्बा इटलीच्या युवेंटस संघात दाखल झाला. त्यावेळी पोग्बानं  युवेंटसशी केवळ 7 कोटी रुपयांच्या आसपास करार केला होता.

 

गेल्या चार वर्षात पोग्बानं दमदार कामगिरी करुन फुटबॉलविश्वावर आपला ठसा उमटवला. त्यामुळंच मॅन्चेस्टर युनायटेडनं पोग्बाला पुन्हा एकदा आपल्या संघात दाखल करुन घेतलं.