Palash Muchhal-Smriti Mandhana News सांगली: स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचं लग्न लांबणीवर पडल्याचे जरी सांगितले जात असले तरी स्मृतीने मेहंदीचे फोटो डिलीट केल्यानंतर आता सोशल मीडियावर अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसेच पलाश मुच्छलचे मेंरी डिकॉस्टा नावाच्या मुलीसोबतचे चॅट सोशल माध्यमावर व्हायरल झाली आहे. पलाशने स्मृती मानधनाचा विश्वासघात केल्याचे आणि तो मेरी डिकॉस्टा या एका मुलीसोबत चॅट करत असल्याचे कथीत स्क्रीन शॉट सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत.
पलाश मुच्छल आणि मेंरी डिकॉस्टाचे चॅट हे स्मृती सोबत पलाशचे लग्न ठरल्यानंतरचे (smriti mandhana palash muchhal wedding) असल्याचे देखील त्यात सांगितले जातेय. या चॅटची एबीपी माझा पुष्टी करत नाही.मात्र या व्हायरल होत असलेल्या चॅटबाबत ना पलाशने काही खुलासा केलाय ना स्मृतीने याबाबत काही पोस्ट केलीय. पलाशचे हे चॅट समोर आल्याने स्मृती आणि पलाशचे या कारणाने तर पुढे ढकलले नाही ना? असा प्रश्न सोशल माध्यमावर विचारला जात आहे. दरम्यान स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच श्रीनिवास मानधनाच्या (Shrinivas Mandhana) करण्यात आलेल्या एन्जोग्राफीत ब्लॉकेज नसल्याचे रिपोर्ट आलेत.
दोन्ही कुटुंबांवर खोलवर परिणाम- (Palash Muchhal-Smriti Mandhana)
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाआधी घडलेल्या घटनेचा दोन्ही कुटुंबांवर खोलवर परिणाम झाला. लग्नाच्या दिवशी, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना (Smriti Mandhana Father) अचानक आजारी पडले आणि त्यांना हृदयविकाराची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर पलाश देखील आजारी पडला आहे आणि त्यालाही सांगली येथे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
पलाश जवळपास 4 तास रडला- (smriti mandhana palash muchhal wedding)
पलाशची आई अमिता मुच्छल यांच्या मते, पलाशचं स्मृतीच्या वडील श्रीनिवास यांच्यासोबत चांगली जवळीक होती. त्यामुळे श्रीनिवास यांची प्रकृती खालावल्याचे कळताच पलाश अस्वस्थ झाला. कुटुंबाच्या मते, पलाश जवळपास 4 तासांपासून रडत होता. पलाश इतका रडला की त्याला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवावे लागले. या भावनिक परिस्थितीत, पलाशने पहिला निर्णय घेतला की स्मृतीचे वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत लग्न होणार नाही.