Hardik Pandya Video : भारताने रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. कर्णधार रोहित शर्माच्या 76 धावांची शानदार खेळी आणि श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. या विजयानंतर संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाचीच चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर दुबई स्टेडियममध्ये टीम इंडियाने जल्लोष साजरा केला. दरम्यान, हार्दिक पांड्याचा नवज्योत सिंग यांचा डान्स व्हायरल होत असतानाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पांड्याला पाकिस्तानींना वाटत असतानाही भारतीय संघ पाकिस्तानात का गेला नाही? असा सवाल करण्यात आला होता. यावेळी हार्दिक पांड्याने अत्यंत हुशारीने उत्तर देत पत्रकाराला सुद्धा नाराज केलं नाही. 

हा माझ्या पगाराच्या वरचा विषय!

हार्दिक पांड्या म्हणाला की, ही चांगली गोष्ट आहे, पण तसं होऊ शकलं नाही. याठिकाणी (दुबई) जितके पाकिस्तानी आले होते त्यांनी नक्की खेळाचा आनंद घेतला असेल, पण कोणं कुठं गेलं, नाही गेलं हा माझ्या पगाराच्या वरचा विषय आहे इतकंच बोलू शकतो. दुसरीकडे, टीम इंडिया जिंकल्यानंतर खेळाडू मैदानात सेलिब्रेशन करताना दिसले. माजी भारतीय खेळाडू आणि सध्याचे समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी  X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अष्टपैलू हार्दिक पंड्यासोबत जबरदस्त नृत्य करताना दिसत आहे.

सिद्धू आणि पांड्याने भांगडा केला

भारतीय संघाचा माजी फलंदाज नवज्योत सिंग सिद्धू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासोबत भांगडा करताना दिसत आहे. यानंतर सिद्धू यांनी हार्दिकला मिठी मारली. पांड्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली.

2017 मध्ये स्वप्न भंगले, आता ते पूर्ण झाले  

भारतीय संघ 2017 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही अंतिम सामना खेळला होता. त्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. त्यावेळीही हार्दिक पांड्या संघाचा एक भाग होता. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 43 चेंडूत 76 धावांची झटपट खेळी केली होती. मात्र तो भारतासाठी सामना जिंकू शकला नाही. हार्दिकला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आली नाही. पण 8 वर्षांनंतर दुबईत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे पांड्याचे स्वप्न पूर्ण झाले. हार्दिक पांड्या भाग असलेल्या टीम इंडियाने गेल्या एका वर्षात 2 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.