PAK vs NZ : पाकिस्तानात जवळपास 29 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळवली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) च्या सलामीच्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. कराचीत सामना सुरू होण्यापूर्वीच आकाशातून एअर शोचा आवाज आला, ज्यामुळे न्यूझीलंडचे खेळाडू आणि स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते घाबरलेले पाहायला मिळाले. पाहाता पाहाता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) सामना सुरू होण्यापूर्वी कराचीमध्ये आकाशात काय दिसले ज्यामुळे मैदानात उपस्थित खेळाडू आणि चाहते घाबरले. जाणून घेऊयात..
वास्तविक, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने कराचीमध्ये एअर शो दाखवला होता. मात्र, या एअर शो मुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंसह चाहत्यांनी फार भीती वाटत असल्याचा जवळपास अभिनयचं केला. आता हा सामना पाकिस्तानात होत असल्याने भीती वाटणे स्वाभाविक आहे. 2007 चे ते भयानक दृश्य कोण विसरू शकेल, जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ले झाले होते. श्रीलंकेच्या एका खेळाडूला गोळी लागली. या अपघातानंतर पाकिस्तानमध्ये अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आता पाकिस्तानात पुन्हा खेळवले जात असले तरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आहेत. देशात दहशतवादी हल्ले होतच असतात आणि त्यामुळेच कराचीच्या आकाशात जेव्हा एअर शोचा आवाज आला तेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंचा श्वास कोंडला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 320 धावा केल्या होत्या. सलामीवीर विल यंग आणि यष्टिरक्षक टॉम लॅथमने शानदार शतके झळकावून पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या आहेत. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह यांच्यासह सर्व पाकिस्तानी गोलंदाजांची न्यूझीलंडच्या फलंदाजानी चांगलीच धुलाई केली आहे. शेवटच्या षटकांमध्ये ग्लेन फिलिप्सने 39 चेंडूत 61 धावांची खेळी करत न्यूझीलंडची धावसंख्या 320 पर्यंत नेली.
इतर महत्त्वाच्या बातम्या