बंगळूर : सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नेतृत्वाखालील वन वर्ल्डने 'वन वर्ल्ड वन फॅमिली कप'मध्ये (One World One Family Cup) युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) वन फॅमिलीचा चार गडी राखून पराभव केला. हा सामना आज (18 जानेवारी) गुरुवारी साई कृष्णन क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सात देशांचे 24 दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या अल्विरो पीटरसनच्या 50 चेंडूत 74 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर वन वर्ल्डने विजय मिळवला.
सचिन आणि नमन ओझा यांनी शानदार सुरुवात करून दिली. ओझाने 18 चेंडूत 25 धावा करताना श्रीलंकेचा अनुभवी चमिंडा वासच्या गोलंदाजीवर चार चौकार मारले. मात्र, सचिनच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने चौकार ठोकत आपले खाते उघडले. त्याने अल्विरोसोबत दुसऱ्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. ट्रेडमार्क कव्हर ड्राईव्ह आणि पॅडवरील फ्लिकसह, सचिनने आपल्या 27 धावांच्या खेळीत तीन चौकार मारले.
12 चेंडूत 17 धावांची गरज असताना इरफान पठाणने संयमी खेळ केला. शेवटच्या सहा चेंडूंवर फक्त सात धावा हव्या असताना, त्याने त्याचा भाऊ युसूफ पठाणच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वन परिवाराने डॅरेन मॅडीच्या 41 चेंडूतील0 51 धावांच्या शानदार खेळीमुळे एकूण 181 धावा केल्या. युसूफ पठाणने (24 चेंडूत 38) आपल्या शानदार फलंदाजीच्या कौशल्याने वन वर्ल्ड इनिंगला अंतिम टच दिला. कर्णधार युवराज सिंगने मिड-विकेटवर ट्रेडमार्क दोन सिक्स लगावले. दोन चौकारही त्याने मारले. त्याने 10 चेंडूत 23 धावा केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या