मुंबई : भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी ट्वेण्टी-20 मालिकेआधी इंग्लंडच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडच्या संघात अष्टपैलू बेन स्टोक्सला स्थान देण्यात आलेलं नाही.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात स्टोक्सच्या पायाचे स्नायू दुखावले होते. या दुखापतीतून तो अजूनही सावरला नसल्याने, त्याला विश्रांती दिल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघातून ट्वेण्टी-20 स्पेशालिस्ट सॅम बिलिंग्ज आणि लियाम डॉसन या दोघांनाही वगळण्यात आलं आहे. दुसरीकडे जो रुट, जॉनी बेयरस्टॉ आणि मोईन अलीसारख्या अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे.
इंग्लंडचा संघ
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टॉ, जेक बॉल, जॉस बटलर (विकेटकीपर), सॅम कुरेन, टॉम कुरेन, अॅलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय , डेविड विली
मालिकेतील सामन्यांचं वेळापत्रक :
3 जुलै : इंग्लंड विरुद्ध भारत, पहिला टी-20 सामना, ओल्ड ट्रॅफर्ड
6 जुलै : इंग्लंड विरुद्ध भारत , दुसरा टी-20 सामना, कार्डिफ
8 जुलै : इंग्लंड विरुद्ध भारत, तिसरा टी-20 सामना, ब्रिस्टल
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी इंग्लंडला मोठा धक्का!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2018 03:02 PM (IST)
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात स्टोक्सच्या पायाचे स्नायू दुखावले होते. या दुखापतीतून तो अजूनही सावरला नसल्याने, त्याला विश्रांती दिल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
यापूर्वी इंग्लंडने भारताविरुद्ध सर्वात जास्त धावा 2011 च्या विश्वचषकामध्ये केल्या होत्या. या सामन्यात 339 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 338 धावांची मजल मारली होती. त्यामुळे हा सामना टाय झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -