Novak Djokovic US Open Champion: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) यानं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कच्या आर्थर अॅशे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित जोकोविचनं रशियाच्या तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा 6-3, 7-6 (5), 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. नोव्हाक जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. आता जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे.


36 वर्षांच्या जोकोविचनं अमेरिकेच्या सेरेना विलियम्सलाही मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. जोकोविचनं ओपनर ऐरामध्ये 23 ग्रँडस्लॅम एकेरीचे खिताब पटकावले आहेत. ऑस्ट्रेलियाची मार्गरेट कोर्टनंही 24 ग्रँड स्लॅम सिंगल्स टायटल्स जिंकले होते, परंतु, त्यामध्ये 13 खिताब ओपन ऐराच्या आधीचेच होते. टेनिसमध्ये ओपन ऐराची  सुरुवात 1968 मध्ये झाली होती. जोकोविचनं जर आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकलं, तर तो टेनिस इतिहासातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकेरी खिताब जिंकण्यात मार्गरेट कोर्टच्या पुढे निघून जाईल.  


टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन 2023 चं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचनं न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तृतिय मानांकित रशियाच्या  डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून 24वं ग्रँडस्लॅम एकेरीचं विजेतेपद पटकावलं. जोकोविचनं पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. यानंतर दुसरा सेट जोकोविच आणि तृतीय मानांकित रशियाच्या  मेदवेदेव यांच्यात एक तास 44 मिनिटं चुरशीची लढत झाली. जोकोविचनं हा सेट 7-6 नं जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचनं मेदवेदेवचा 6-3 असा पराभव करत विजय मिळवला. जोकोविच आतापर्यंत 36 वेळा ग्लँडस्लॅम फायनल खेळला आहे. त्यापैकी 34 विजेतेपद त्यानं पटकावली आहेत. तो 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन ठरला आहे.






जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यातील अंतिम सामना एकूण तीन तास 17 मिनिटं चालला. जोकोविचनं पहिला सेट सहज जिंकला, पण दुसऱ्या सेटमध्ये त्याला मेदवेदेवने कडवी झुंज दिली. 1 तास 44 मिनिटे चाललेल्या दुसऱ्या सेटमध्ये असे काही क्षण आले, जेव्हा जोकोविच हतबल होताना दिसला. पण या सर्बियन खेळाडूनं हिंमत हरली नाही आणि टायब्रेकरमध्ये दुसरा सेट जिंकला. दुसरा सेट गमावल्यानंतर मेदवेदेवला तिसऱ्या सेटमध्येही पुनरागमन करता आलं नाही. जोकोविचचं हे चौथं यूएस ओपन जेतेपद ठरलं आहे. 


सर्वाधिक ग्रँडस्लॅम (पुरुष सिंगल्स)


1. नोवाक जोकोविच (सर्बिया) : 24 (ऑस्ट्रेलियन-10, फ्रेंच-3, विम्बलडन-7, यूएस-4)
2. राफेल नडाल (स्पेन) : 22 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-14, विम्बलडन-2, यूएस-4) 
3. रोजर फेडरर (स्विट्झर्लंड) : 20 (ऑस्ट्रेलियन-6, फ्रेंच-1, विम्बलडन-8, यूएस-5)
4. पीट सॅम्प्रास (अमेरिका) : 14 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-0, विम्बलडन-7, यूएस-5)


सर्वाधिक ग्रँडस्लॅम फायनल (पुरुष सिंगल्स) 



  • नोवाक जोकोविच 36

  • रॉजर फेडरर 31 

  • राफेल नडाल 30 

  • इवान लेंडल 19 

  • पीट सम्प्रास 18


नोव्हाक जोकोविच त्याच्या टेनिस कारकिर्दीतील 36व्या ग्रँडस्लॅम एकेरीच्या अंतिम फेरीत खेळत होता, टेनिस ओपनमध्ये खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूहून सर्वाधिक आहे. उपांत्य फेरीत जोकोविचनं बेन शेल्टनचा 6-3, 6-2, 7-6 (4) असा पराभव केला. तर डॅनिल मेदवेदेवने उपांत्य फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा 7-6 (7-3) 6-1, 3-6, 6-3 असा पराभव केला.