आंतरराष्ट्रीय सामन्याची सुरुवात प्रत्येक देशाच्या राष्ट्रगीताने होते. मात्र भारत आणि श्रीलंका यांच्यातील उर्वरित वन डे सामन्यांपूर्वी राष्ट्रगीत गायलं जाणार नाही. श्रीलंका क्रिकेट संघाचे माध्यम व्यवस्थापक दिनेश रत्नसिंघम यांनी याबाबत माहिती दिली.
भारत आणि श्रीलंका संघांमधला दुसरा वन डे सामना उद्या (गुरुवार) कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. मात्र श्रीलंकेत असा नियम आहे की, कोणत्याही मालिकेच्या केवळ पहिल्याच सामन्यात उभय देशांचं राष्ट्रगीत गायलं जातं.
दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही पहिल्या कसोटीनंतर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत गाण्यात आलं नाही. आता वन डेतही त्याचप्रमाणे उर्वरित सामन्यांमध्ये राष्ट्रगीत गायलं जाणार नाही.