Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटीत पदार्पण केले. या दोघांनी पहिल्याच सामन्यात प्रभावी कामगिरी केली. नितीश कुमार रेड्डीला त्याचा आयडाॅल विराट कोहलीकडून पदार्पणाची कॅप मिळाल्याने आश्चर्य वाटले. 21 वर्षीय अष्टपैलू खेळाडू म्हणाला की, (कोहलीकडून कॅप मिळणे) खूप छान भावना होती. मी नेहमीच भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले आहे आणि हा एक चांगला क्षण होता. मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा विराट भाऊ माझा आदर्श होता. त्यामुळे त्याच्याकडून पदार्पणाची कॅप मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता.


नितीश रेड्डीचा सेल्फीचा फोटो व्हायरल  


दरम्यान, नितीश रेड्डीचा 2018 मधील सेल्फीचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहली पत्नी अनुष्कासह मागे बसले आहेत, नितीश रेड्डी त्या दोघांसोबत सेल्फी टिपण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच नितीश रेड्डीचे कोहलीसोबत खेळण्याचे स्वप्न पहिल्यांदा पर्दापण कॅप देऊन आणि त्यानंतर संघ अडचणीत असताना पर्थमधील दुसऱ्या कसोटीत त्याच्यासमवेत खेळून स्वप्न पूर्ण झाले. विराट कोहलीला प्रदीर्घ कालावधीपासून शतकी खेळी करता आली नव्हती. मात्र, पर्थ कसोटीत त्याने 81व्या आंतरराष्ट्रीय शतकाची नोंद केली. दुसऱ्या डावात नितीशने नाबाद 37 धावा केल्या.    




नितीशने पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केली


दरम्यान, पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नितीशने दमदार कामगिरी केली. त्याने 59 चेंडूंचा सामना करत 41 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि एक षटकार आला. खेळ संपल्यानंतर त्याला ऑफस्पिनर नॅथन लियॉनविरुद्ध आक्रमक वृत्ती अंगीकारण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, मला वाटले की खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत आहे, त्यामुळे मला धावा करण्याच्या संधी शोधाव्या लागल्या. जेव्हा लियॉन गोलंदाजीला आला तेव्हा दोन-तीन चेंडू तपासल्यानंतर मला समजले की त्याला खेळपट्टीकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे मी त्याच्याविरुद्ध धावा करण्याचा निर्णय घेतला.


इतर महत्वाच्या बातम्या