मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकच्या आणखी एका खेळाडूचं निलंबन
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2017 09:55 PM (IST)
लाहोर : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणखी एका क्रिकेटरवर कारवाई केली आहे. पीसीबीने कसोटी क्रिकेटर नासिर जमशेदचं निलंबन केलं आहे. पीसीबीने गेल्या आठवड्यातच शर्जिल खान आणि खलिद लतीफवरही निलंबनाची कारवाई केली होती. त्या दोघांनी तपासणीदरम्यान नासिर जमशेदने आपली संशयित सट्टेबाजासोबत भेट घडवून आणण्याचं ठरवलं होतं, अशी माहिती दिली होती. त्यानंतर जमशेदवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 27 वर्षीय नासिरने दोन कसोटी, 48 वन डे आणि 18 ट्वेन्टी20 सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं होतं. पण 2015 सालच्या विश्वचषकानंतर तो संघाबाहेरच आहे. दोन वर्षांपूर्वी बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान बीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानंही नासिरची चौकशी केली होती.