एक्स्प्लोर

भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी नागपूर पोलिसांकडून जय्यत तयारी; वाहतुकीत मोठे बदल, मार्गदर्शन सूचना जाहीर!

Nagpur News : नागपुरात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दरम्यान होणाऱ्या एक दिवसीय सामन्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे.

Nagpur News : नागपुरात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs ENG)  दरम्यान होणाऱ्या एक दिवसीय सामन्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. नागपूर - वर्धा रोडवरील व्ही.सी.ए क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियमवर 6 फेब्रुवारी रोजी हा सामना होणार असून तब्बल 2000 पोलीस कर्मचारी आणि 600 वाहतूक शाखेचे पोलीस (Nagpur Police) कर्मचारी या बंदोबस्तासाठी लावले जाणार आहे. नागपुरात जेव्हाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होतो तेव्हा स्टेडियमच्या अवतीभवती पार्किंगसाठीची मोठी समस्या उद्भवते. मात्र यंदा पोलिसांनी भरपूर पार्किंगची जागा उपलब्ध केल्याचा दावा केला आहे. 7 हजारपेक्षा जास्त चार चाकी वाहन आणि 10  हजार दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध करण्यात आल्याचा दावा नागपूरचे वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक यांनी केला आहे.

 मार्गदर्शन सूचना जाहीर! नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा 

एवढेच नाही तर स्टेडियम पासून एक किलोमीटर अंतरावर प्रत्येकी दहा एकर पेक्षा जास्त आकाराच्या दोन पार्किंग स्पेस राखीव ठेवण्यात आल्या असून तिथून स्टेडियमपर्यंत बस सेवा ही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या दिवशी टीम इंडिया आणि इंग्लंड मधील एक दिवसीय सामना जामठा स्टेडियमवर खेळला जाईल, त्या दिवशी वर्धा रोडवर बुटीबोरी ते खापरीदरम्यान जड वाहनांची वाहतूक पूर्ण दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल अशी माहितीही वाहतूक उपायुक्तांनी दिली. एवढेच नाही तर सामना बघायला आलेल्या कुठल्याही प्रेक्षकांनी नागपूर वरून स्टेडियम कडे जाताना आणि स्टेडियम वरून नागपूरकडे परत येताना महामार्गावर त्यांची वाहने थांबवू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

नागपूर पोलिसांनी टीम इंडियाच्या पडद्यामागील 'हिरोला' रोखलं, नेमकं काय घडलं?

नागपूरमध्ये उद्या (6 फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. व्ही.सी.ए क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ नागपूरमध्ये दाखल झाला आहे. तर दुसरीकडे उपराजधानी नागपुरात  क्रिकेटप्रेमीही सज्ज झाले आहे. नुकतेच नागपुरात भारतीय संघाचे आगमन झाले असून खेळाडू शहरातील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये मुक्कामी आहेत. या हॉटेलला जात असताना चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचे बघायला मिळाले. परिणामी पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त केला होता. अशातच या हॉटेल परिसरात एक मजेशीर प्रसंग घडलाय. नागपूर पोलिसांनी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील राघवेंद्र द्विवेदी म्हणजेच रघूला चाहता समजून हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखलंय. रघूने पोलिसांशी थोडा वेळ चर्चा केल्यानंतर पोलिसांना त्यांची चूक लक्षात आली, आणि मग पोलिसांनी त्याला आत जाऊ दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज

व्हिडीओ

Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक
Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Embed widget