स्पेनचा माजी वर्ल्ड नंबर वन राफेल नदालनं मनगटाच्या दुखापतीमुळं विम्बल्डनमधून माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात फ्रेन्च ओपनदरम्यान नदालची दुखापत आणखी बळावली होती.


 

त्यावेळी झाल्येला दुखापतीमुळं नदालनं फ्रेन्च ओपनच्या दुसऱ्या फेरीनंतर माघार घेतली होती. तीस वर्षीय नदाल दुखापतीतून अजूनसावरलेला नसून आपण विम्बल्डनमधूनही माघार घेत असल्याचं त्यानं फेसबुकवरून जाहीर केलं.

 

याआधी 2009 सालीही नदाल दुखापतीमुळं विम्बल्डनमध्ये खेळू शकला नव्हता. नदालनं 2008 आणि 2010 साली विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं होतं.